बातमी महाराष्ट्राची | ज्योतिषशास्त्र
▪ मेष - आज आपणास आपल्या कुटुंबा कडून काही प्रमाणात भौतिक मदत मिळण्याची शक्यता आहे. हे बहुदा चांगल्या कारणांसाठीच असल्याने आपण नक्कीच त्यासाठी त्याचा वापर करण्याची काळजी घ्यावी असे गणेशा सांगत आहे. ज्या व्यक्तीने आपणास मदत केली आहे अशा आपल्या प्रियव्यक्तीसह संध्याकाळ घालवून आपण दिवसाची अखेर करण्याची शक्यता आहे.
▪ वृषभ - आपण दिवसभर अनुपलब्ध राहण्याची शक्यता आहे. एक सूचना:लक्ष केंद्रित करून आपल्या वेळेचा व शक्तीचा दुरुपयोग होणे टाळा. कामात किंवा चालू असलेल्या प्रकल्पात आपणास ताण जाणवू शकतो. आपल्या प्रियव्यक्तीच्या सहवासात संध्याकाळ शांततेत घालवण्याची अपेक्षा आपण बाळगू शकता असे गणेशा सांगत आहे.
▪ मिथुन - स्वतःचे लक्ष वेधून घेण्याच्या व वैभवी जीवनशैलीत सुद्धा आरामदायी एकांतात राहण्याची इच्छा आपल्यावर ताबा मिळवेल. स्वतःला जगा पासून दूर ठेवण्याची व आपल्या आवडीचा पाठपुरावा करण्याची आपली इच्छा असेल. संध्याकाळी एखाद्या खास व्यक्तीशी भांडणात आपला वेळ जाईल, असे गणेशा सांगत आहे.
▪ कर्क - आजचा दिवस आपणास अनुकूल आहे. कुटुंबातील स्त्रियांकडून काही प्राप्ती होण्याची संधी असल्याचे गणेशास दिसते. आश्चर्याची बाब म्हणजे कोणत्याही पूर्व नियोजना शिवाय आपली कामे पूर्ण होतील. वरिष्ठ व सहकाऱ्यांशी कोणतेही चढ - उतार न येता संबंधात स्थैर्य राहील. आपली काही स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील.
▪ सिंह - आज आपण व्यवसायात काही स्फुर्तीदायक घटनांना सामोरे जाल. काही नवे प्रकल्प राबविण्यासाठी तयार राहा. आपल्या काही नवीन संकल्पना पूर्णत्वाची वाट पाहात आहेत. संध्याकाळी कुटुंबातील व्यक्तींकडून प्रेम व आदर ह्यांचा वर्षाव होईल असे गणेशास वाटते.
▪ कन्या - घरगुती जवाबदाऱ्याना आज थोडी विश्रांती द्या. आपल्या हाताखालील व्यक्ती आपणास पाठिंबा देतील. पण हे लक्षात ठेवा कि आपणास जे हवे आहे ते मिळविण्यासाठी आपणास जास्त कष्ट घ्यावे लागतील. लोकांपासून सावध राहा.
▪ तूळ - आज आपण जे नवीन प्रकल्प, करार किंवा सौदे कराल त्यात आपणास सावध राहण्याची गरज असल्याचे गणेशा सांगत आहे. आज कार्यालयात आपणास वरिष्ठांचा राग सहन करावा लागेल, मात्र दुपार नंतर आपली कार्यक्षमता व कौशल्याच्या जोरावर आपण त्यांना प्रभावित करू शकाल व त्यामुळे ह्या पूर्वी त्यांच्या आपल्या बद्धल असलेल्या शंका दूर होतील. आज आपण कामासाठी अधिक वेळ दिल्याने कुटुंबीयांकडे आपले दुर्लक्ष होत असल्याचे जाणवून आपणास त्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल.
▪ वृश्चिक - आज आपण समाजात वावरण्याचा आनंद मिळवाल, असे गणेशा सांगत आहे. संध्याकाळ समविचारी व आनंदी लोकांच्या सहवासात रात्री भोजन घेण्यात घालवू शकाल. दिवसा आपण संध्याकाळची योजना तयार कराल. कदाचित ह्यामुळेच काम करण्याच्या मनःस्थितीत आपण आज नसाल.
▪ धनु - आज समस्यांचा सामना करावा लागेल, असे गणेशास दिसत असून एखाद्या प्रकरणात आपणास गोवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. परंतु जशी त्यात प्रगती होत जाईल तशी आपली मानसिकता बदलून मनोबल वाढेल. दिवस अखेरीस मित्र व कुटुंबियांसह वेळ घालवून शांतता अनुभवाल.
▪ मकर - आपण कामाचा ढिगारा उपसण्याची जवाबदारी घेऊन त्यावरच आपले लक्ष केंद्रित कराल, असे गणेशास दिसत आहे. खरे तर कामाच्या न संपणार्या ताणामुळे आपण इतके निराश व्हाल कि संपूर्ण दिवस काम कसे पूर्ण करावे ह्याचाच विचार करीत बसाल. परंतु, काबाड कष्ट केल्यावर दिवस अखेरीस मात्र आपल्या प्रेम प्रकरणाची पराकाष्ठा गाठणारी घटना घडेल. आपण ती पराकाष्ठा गाठताना मात्र सुरक्षित उपाय करण्यास विसरू नका.
▪ कुंभ - सहसा कोणी ज्या मार्गाने जात नाही अशा एका मार्गाने आज आपण प्रवास कराल. आपणास आध्यात्मात समाधान लाभेल. आत्ता पर्यंत आपण खूप परिश्रम केले असून आता थोडी विश्रांती घेण्याची वेळ आली असल्याचे गणेशास वाटते. आपल्या मित्रांसह वेळ घालवून, आपल्या आवडत्या ठिकाणी फिरावयास जाऊन स्वतःला तजेला द्या. असे करण्यात आपला वेळ वाया जाणार नसून आपल्या उज्ज्वल उद्यासाठी आपण स्वतःला सज्ज कराल.
▪ मीन - दुपारच्या सुमारास आपल्या कल्पनांची युक्ती व सूचना कामाच्या ठिकाणी आपण मांडाल, असे गणेशा सांगत आहे. कदाचित आठवडयाच्या अखेरीस कामातून छोटी रजा घेतल्याने आपली ऊर्जा वाढेल.

