अजय देवगणसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहणार 'तान्हाजी' चित्रपट

0 झुंजार झेप न्युज

आज संध्याकाळी 6 वाजता मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसाठी तान्हाजी चित्रपटाचा प्लाझा या चित्रपटगृहात शो आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अभिनेता अजय देवगण हे दोघे एकत्र हा चित्रपट पाहणार आहेत. रिलीजपासून तान्हाजी चित्रपटाची चांगलीच क्रेझ सगळ्यांमध्येच पाहण्यास मिळत आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.
अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, अजिंक्य देव आदींच्या तान्हाजी या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा हा किल्ला जिंकण्याची जबाबदारी घेतली होती. तान्हाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांना मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आले होते. त्यांना या मोहिमेबाबत त्यावेळी समजले असता आधी लगीन कोंढण्याचे मगच माझ्या रायबाचे असे म्हणून तान्हाजी मालुसरे कोंढाण्याच्या मोहिमेवर गेले. त्यांना हा किल्ला जिंकताना वीरमरण आले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजही गड आला पण माझा सिंह गेला असे म्हणत हळहळले. तान्हाजी मालुसरे यांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंह असा केला म्हणूनच कोंढण्याला सिंहगड असे नाव पडले. तान्हाजी चित्रपटातून हाच गौरवशाली इतिहास रुपेरी पडद्यावर साकारण्यात आला आहे.
दरम्यान काल सिटी सेंटर मॉल या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही तान्हाजी हा चित्रपट पाहिला. छगन भुजबळ यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर तान्हाजीच्या पोस्टरपुढे उभे राहून सेल्फी देखील काढला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.