नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' सिनेमाचा दमदार टीझर; अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत!

0 झुंजार झेप न्युज

मुंबई | नागराज मंजुळे दिग्दर्शित, अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित 'झुंड' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. अभिनेता अभिषेक बच्चनने ट्विटरवरुन झुंडचा टीझर शेअर केला आहे.
'सैराट'च्या उत्तुंग यशानंतर नागराज मंजुळे मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरले. आता नागराज मंजुळे यांचा 'झुंड' हा पहिला हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकमध्ये दिसणार आहेत. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले आहेत. यामुळेच 'झुंड'बद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर मंगळवारी प्रदर्शित झाला.

विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित'झुंड' हा चित्रपट आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या याच कथेवर हा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. शूटिंगसाठी सुरुवातीला पुण्यात सेट तयार करण्यात आला होता. मात्र काही कारणांमुळे हा चित्रपट वादात अडकला होता. चित्रपटाची शूटिंगही थाबली होती. अखेर चित्रपटाचे टिझर रिलीज झाले आहे. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.