सहकाऱ्याच्या गोळीबारात सीआयएसएफ जवान ठार; उधमपूर कॅम्पमधील घटना

0 झुंजार झेप न्युज

उधमपूर : सीआयएसएफ दलाच्या काश्‍मिरातील उधमपूर येथील तळावर जवानाने केलेल्या गोळीबारात दोन जवान मरण पावले. तर अन्य एक जण जखमी झाले. मंगळवारी ही घटना घडली.
उधमपूरच्या जिल्हा मुख्यालयापसून पाच किमीवरील सुई या गावात ही घटना घडली. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, छावणीत एका जवानाने झालेल्या भांडणाच्या रागातून सहकाऱ्यावर गोळी झाडली. यात जखमी झालेल्या तीनही जवानांना उधमपूर जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले.
तेथे हवालदात बीएन मुर्ती आणि महंमद तस्लीम यांना मृत घोषीत करण्यात आले. प्रथमोपचार हवालदार संजय थाळी यांना पुढील उपचारासाठी जम्मू येथे हलवण्यात आले. जखमी की मृत नेमक्‍या कोणत्या जवानाने गोळीबार केला, हे समजू शकले नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.