महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला आढावा

0 झुंजार झेप न्युज

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला आढावा

सातारा,दि.17: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा येथे 4 ते 9 एप्रिल 2022 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीचा आढावा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, दिलीप पवार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे चांगल्या पद्धतीने नियोजन करावे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंच्या निवास व्यवस्था, नाष्टा, जेवण व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना करुन पार्कींग व्यवस्था व अन्य इतर सोयी सुविधाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.