जालना पंचायत समितीची इमारत राज्यासाठी आदर्श ठरावी - महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

0 झुंजार झेप न्युज

जालना पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण संपन्न 

जालना,दि. 19 : जालना येथे नूतन पंचायत समितीची अत्यंत सुसज्ज व सर्व सोई-सुविधांनी युक्त अशी इमारत उभारण्यात आली असुन ही इमारत राज्यासाठी आदर्श ठरावी, असे प्रतिपादन राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.जालना येथे पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, महेंद्र पवार, अनिरुद्ध खोतकर, भास्कर आंबेकर, पुजा सपाटे, भास्कर आंबेकर, ए. जे.बोराडे, मनीष श्रीवास्तव, विमलताई पाखरे, पंडित भुतेकर, पांडूरंग डोंगरे, संतोष मोहिते, फेरोज लाला तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शन व पुढाकाराने उभारण्यात आलेली जालना पंचायत समितीची ईमारत ही मराठवाड्यातील एकमेव सुसज्ज व सर्वसुविधांनी परिपूर्ण प्रशासकीय ईमारत आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची प्रशासकीय कामे तत्परतेने पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, पंचायत समितीची सुसज्ज व सर्व-सुविधांनीयुक्त अशी नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली असुन त्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे. जालना जिल्ह्यात अनेक शासकीय कार्यालये ही भाड्याच्या इमारतीमधून आपला कारभार चालवत आहेत. अशा शासकीय विभागांना नवीन इमारती मिळाव्यात. तसेच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करुन पंचायत समितीची ही इमारत उभारण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभरात मॉडेल ठरावी अशा पद्धतीचा इमारत बांधकामासाठी प्लॅन ठरविण्यात आला होता. या इमारतीमधील फर्निचरसाठी दीड ते दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला तो पुरेसा नाही. फर्निचरसाठी तसेच पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणीही त्यांनी यावेळी मंत्री महोदयांकडे केली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.