'दिलदार राजा'कडून नवीकोरी गाडी घेतलीत, मनसेचा संजय राऊतांना टोला

0 झुंजार झेप न्युज

प्रतिनिधी :
पुणे : बुधवारी पुण्यात लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, 'आज भारतात दाऊद इब्राहिमला पाहणारे त्याच्याशी बोललेले फार कमी लोक आहेत. मात्र मी दाऊदला पाहिले आहे. त्याच्याशी बोललो देखील आहे. एकवेळ त्याला दमसुद्धा दिला होता, असे विधान राऊत यांनी केले होते.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केल्यानंतर मनसेकडून त्यांना कानपिचक्या लगावण्यात आल्या आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत राऊत यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला आहे. मी ओसामा बिन लादेनशी बोललो होतो, असं ट्वीट देशपांडे यांनी केले आहे.
मी ओसामा बिन लादेन शी बोललो होतो आणि त्याला 9/11 नंतर दम पण दिला होता. आणी हो ज्या महाराष्ट्र सैनिकांनी तुमची गाडी जाळली होती त्यांचा आम्हाला अभिमान आहे .आमच्या"दिलदार राजाकडून "तुम्ही नवी कोरी गाडी देखील घेतली होती
78 people are talking about this
तसेच या ट्वीट मध्ये पुढे देशपांडे म्हणतात, 'मी ओसामा बिन लादेनशी बोललो होतो आणि त्याला 9/11 नंतर दम पण दिला होता. आणि हो, ज्या महाराष्ट्र सैनिकांनी तुमची गाडी जाळली होती, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या "दिलदार राजाकडून" तुम्ही नवी कोरी गाडी देखील घेतली होती' असा जळजळीत टोला देशपांडेंनी राऊतांना लगावला आहे.

दरम्यान, एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा बोलबाला होता. आताअंडरवर्ल्डचं अस्तित्व काहीच राहिलं नाही, आधी कोण मुख्यमंत्री होणार, कोण सरकारमध्ये येणार हे अंडरवर्ल्ड ठरवायचे. अशा त्या काळात मी अंडरवर्ल्डच्या अनेक लोकांना पाहिलंय. मी दाऊदपासून सगळ्यांचे फोटो काढले आहेत. आज भारतात दाऊद इब्राहिमला पाहणारे त्यात्याशी बोललेले फार कमी लोक आहेत. मात्र मी दाऊदला पाहिलंय, त्याच्याशी बोललोल. एकवेळ तर त्याला दमसुद्धा दिला होता,"असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.