मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. आज सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. येथे त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. आज ते अंबाबाईच्या दर्शनासाठी १० ते १२ मिनिटे मंदिराच्या गाभाऱ्यात होते. चांदीची तलवार आणि चांदीचा धनुष्यबाण देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार धैयशील माने, मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले होते.
दरम्यान, आजचा मुक्काम ठाकरेंचा कोल्हापूर येथे आहे. तसेच श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर पुढच्या नियोजित दौऱ्याला मुख्यमंत्री ठाकरे सुरुवात करणार आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरे कोल्हापूर येथे मुक्कामी होते. तसेच आज सकाळी त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली होती.

