प्रतिनिधी :
मुंबई : मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरे भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरेंची भेट ही महत्वाची मानली जात आहे. तसेच महाअधिवेशनापूर्वी हर्षवर्धन जाधव पुन्हा घरवापसी करणार असल्याचं बोललं जात आहे.
हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. तसेच ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.
येत्या 23 जानेवारी रोजी मनसेचं पहिलंच अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

