कन्हानमध्ये शिवसेना उमेदवाराच्या नातेवाईकाची चाकूने भोसकून हत्या

0 झुंजार झेप न्युज

नागपूर :- जिल्ह्यातील कन्हानमध्ये सोमवारी रात्री तरुणाची हत्या करण्यात आली.यामुळे नागपूर जिल्ह्यातील कन्हान नगरपरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला अंतिम टप्प्यात हिंसक वळण लागलंय.
संजय खडसे या तरुणाची एका बारबाहेर हत्या करण्यात आली. संजय हा नागपूर नगर परिषद निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवाराचा जावई होता.
मद्यपान करत असलेल्या काही तरूणांची शेजारच्या टेबलावर बसलेल्या गटाशी वादावादी झाली. त्यातून तिघांनी शिवसेना उमेदवाराच्या नातेवाईकाला बाटल्या भोसकून ठार केलं.
नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. कन्हान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक ९ जानेवारी रोजी होत आहे.
प्रभाग ८ चे शिवसेना उमेदवार डायनल शेंडे यांचे नातेवाईक संजू खडसे सोमवारी रात्री एका बारमध्ये मद्यपान करत असताना बाजूच्या टेबलवर बसलेल्या तिघांशी त्यांचे वाद झाले.
थोड्या वेळाने बारच्या बाहेर आल्यावर त्यांच्यात पुन्हा वाद झाले आणि तिघांनी संजू खडसे यांच्यावर चाकूने वार केले व पळ काढला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच संजू खडसे यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडालेला असतानाच शिवसेना उमेदवाराच्या जावयाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. बारमधील वादातून हे हत्याकांड घडलं, की याला राजकीय रंगही आहे, याचा तपास नागपूर पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.