पुणेः हिंजवडी पोलिस ठाण्यात उपनिरीक्षकास २५ हजारांची लाच घेताना पकडले

0 झुंजार झेप न्युज

फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी तक्रारदार व्यक्तीकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली.
मिलन शंतनू कुरकुटे (वय 32, पोलीस उपनिरीक्षक, हिंजवडी पोलीस ठाणे) असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भात फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी आरोपी मिलन कुरकुटे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी कुरकुटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.