नगरमध्ये तलाठी परीक्षेत पाच जण बसले डमी; दहा जणांवर गुन्हा,तिघांना अटक

0 झुंजार झेप न्युज

नगर - नुकत्याच झालेल्या तलाठी संवर्गाच्या परीक्षेत डमी विद्यार्थी बसल्याचा प्रकार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उघडकीस आनला होता. या परीक्षेत डमी परीक्षार्थी म्हणून बसवलेल्या तिघांना काल रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने अटक केली. त्यांना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपी मंगेश कुंडलिक दांडगे, विशाल सखाराम इंगळे, अंजली गोपाल म्हस्के, पंढरीनाथ पुंजाजी साबळे, रवी जंगल पवार यासह अनोळखी पाच जणांनवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहरात (दि.12) जानेवारी रोजी तलाठी संवर्गासाठी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी काही परीक्षा केंद्रावर मूळ परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांऐवजी डमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा प्रकार समोर आला होता.
या परीक्षेत महसूल विभागाच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांची व्हिडीओ शुटिंग करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी दखल घेत याप्रकरणाचा सखोल तपास केला. यात त्यांनी गुरूवारी रात्री उशिरा दोघा विद्यार्थ्यांसह एका विद्यार्थिनीस ताब्यात घेऊन तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले.
याच परीक्षेत एकूण दहाजण डमी विद्यार्थी बसले होते. त्या सर्वांना ताब्यात घेण्यासाठी रात्रीच पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती मिटके यांनी दिली. दरम्यान शासकीय परीक्षेत डमी विद्यार्थी बसवणारे रॅकेट सक्रीय असल्याचे पोलिसांच्या तपासावरून समोर येत असून आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.