मुंबईतील नाईट लाईफवर अमृता फडणवीस म्हणतात...

0 झुंजार झेप न्युज

आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफला २६ जानेवारीपासून मुंबईत सुरवात होत आहे . यामुळे मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंबंधीच्या बोलावलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबईतील नाईट लाईफबद्दल अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘नाईट लाईफविषयी अजून काही विचार केलेला नाही. यात सुरक्षेचा प्रश्न कसा हाताळला जाईल हे पाहणं आवश्यक आहे. ‘महिला दिवस-रात्र येथे काम करतात. महिलांसाठी मुंबई सुरक्षित आहे. त्यामुळे मुंबईचा मला अभिमान वाटतो. मुबंईसारखे अनुकरण दुसऱ्या शहरांनीदेखील करावं," असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
तसेच माझ्या सारख्या शिवसैनिकाला खरा नेता पाहण्याची गरज असते. त्यांना फॉलो करण्याची गरज असते, त्यामुळे आता आपल्याला खऱ्या नेत्याची खूप गरज आहे. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तर फोन टॅप प्रकरणावर म्हणाल्या की, या तिघा पक्षांना भाजप नकोय, त्यामुळे ते भाजपवर खोटे आरोप करतायत. आणि आधीच्या सरकारमध्ये शिवसेना देखील होती त्यामुळे याची चौकशी झाली तरी चालेल. एकंदरीत सगळ्याच विषयावर अमृता यांनी बेधडक उत्तरे दिली आहेत.
दरम्यान, शरद पवार सुरक्षा काढून घेतल्याबाबत अफवा पसरवली जात असेल, यामध्ये काही तथ्यही नसेल असं वाटत आहे, असं त्या म्हणाल्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्यांवर भाष्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.