औरंगाबाद | इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहात, तुमच्या कानांना मशिदीवरील भोग्यांचा त्रास झाला नाही का?, असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना विचारला आहे. ते टीव्ही 9 या मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.
फक्त राजकारणासाठी हा मुद्दा पुन्हा काढला जात आहे. शिवसेना सेक्युलर झाली आहे, त्यामुळे आता मनसेसाठी जमीन तयार झाली आहे आणि त्याचा फायदा घेण्यासाठी मनसे राजकारण करत आहे, असा आरोप इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंवर केला आहे.
आम्ही मनसेला घाबरत नाही. आम्ही आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलं आहे. त्यामुळे एमआयएम कुणालाही घाबरत नाही, असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत.
दरम्यान, धर्म प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावेत. त्यासाठी मशिदींवर भोंगे काढावेत. आमची आरती त्रास देत नाही, नमाज का त्रास देतेय? असा सवाल राज ठाकरेंनी मनसेच्या अधिवेशनात बोलताना केला. यावरून इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना खडेबोल सुनावले.

