रतन टाटांच्या तरुणपणातील फोटोवर फिदा नेटकरी

0 झुंजार झेप न्युज

मुंबई : टाटा ग्रुपचे 82 वर्षीय चेअरमन रतन टाटा यांनी गुरूवारी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. लॉस एंजिल्समधील हा फोटो भारतात येण्यापूर्वीचा आहे. रतन टाटांनी आपल्या तरूणपणीचा फोटो शेअर करून सगळ्यांनाच थक्क केलं आहे.
इंस्टाग्रामवर रतन टाटांनी आपला 25 वर्षाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो एखाद्या अभिनेत्याला लाजवेल असा आहे. एका युझरने म्हटलं की, रतन टाटा एखाद्या हॉलिवूड स्टारप्रमाणे दिसत आहेत. रतन टाटांनी अमेरिकेत शिक्षण घेतले आणि काही काळ काम केल्यानंतर 1962 मध्ये भारतात परतले. त्यावेळी ते अवघे 25 वर्षांचे होते.

टाटा यांनी लिहिले आहे की,'बुधवारी मी हा फोटो शेअर करणार होतो. मात्र मला कुणीतरी #ThrowbackThursday यबद्दल सांगितलं. या हॅशटॅगसोबत जुने फोटो शेअर करतात.' त्याप्रमाणे त्यांनी आपला 25 वर्षांचे असतानाचा फोटो शेअर केला आहे.

महत्वाचं म्हणजे 3 तासात जवळपास 1 लाख 81 हजार लोकांनी हा फोटो पाहिला असून त्याला लाईक केलं आहे. 30 ऑक्टोबरपासून रतन टाटा इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ऍक्टिव आहेत. त्यांचे आतापर्यंत 8 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.