वाळुच्या ट्रकचे टायर चोरताना पोलिसासह तिघांना अटक

0 झुंजार झेप न्युज

अक्कलकोट शहरातील जुनी पोलीस वसाहत येथे लावण्यात आलेल्या वाळुच्या मालट्रकचे चाक चोरून नेताना, पोलीस कॉन्स्टेबलसह तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पोलिसांनी पकडलेली वाहने पोलीस ठाण्यातच सुरक्षीत नसल्याचे उघड झाले आहे.
पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब ब्रह्मदेव शिंदे (नेमणूक जेलरोड पोलीस ठाणे, सोलापूर), सोमा विठ्ठल गायकवाड (रा. बोळकवठा. ता. दक्षिण सोलापूर), गणेश मल्लेश मरेवाले (रा. मळसिद्धनगर मंद्रुप दक्षिण सोलापूर), दयानंद बसवराज यळकर (रा.मळसिद्धनगर मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेकायदा वाळु वाहतुकीच्या गुन्ह्यात पकडलेला मालट्रक (एमएच 12 एयू 7937) जप्त करण्यात आला होता. हा ट्रक जुनी पोलीस वसाहत येथे रुम नं. 28 व 29 समोर लावण्यात आला होता. मंगळवारी (दि7) सांयकाळी साडेपाचच्या सुमारास भाऊसाहेब शिंदे आणि अन्य तिघे जुनी पोलीस वसाहतमध्ये आले. मालट्रकच्या पाठीमागील बाजूचे 40 हजार रुपये किंमतीचे लोखडी डिस्कसह दोन चाके घेऊन जाताना त्यांना वसाहतीमधील पोलिसांनी पाहिले.
चोरीचा प्रकार लक्षात येताच चौघांना अक्कलकोट पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता शिंदे हा पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.