पिंपरी दि. १४ फेब्रुवारी २०२० – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराज समाजप्रबोधन पर्वानिमित्त सोमवार दि. १७ फेब्रुवारी ते बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२० अखेर डांगे चौक, थेरगाव येथे प्रबोधन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून कार्यक्रमाची सुरवात जीवन विद्या मिशनचे श्री. संतोष तोतरे यांच्या राष्ट्रभक्ती या विषयावरील व्याख्यानाने होणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, हे लाभणार असून प्रमुख उपस्थितीत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे असणार असून विशेष उपस्थितीमध्ये खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, आण्णा बनसोडे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष अमित गोरखे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असून विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य अॅड. सचिन भोसले, निलेश बारणे, नगरसदस्या झामाबाई बारणे, माया बारणे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रशांत देशमुख हे उठ युवका जागा हो शिवचरित्राचा तू धागा हो या विषयावर व्याख्यान देणार असून बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी श्री. रविंद्र खरे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानाने सांगता होणार आहे.
या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.

