दुधाच्या टँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक, पुण्याजवळ टँकर पकडला

0 झुंजार झेप न्युज

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या ३ मे पर्यंत देशभरात लॉकडाउन वाढवण्यात आले आहे. लोकांची जीवानावश्यक वस्तूंसाठी मारमार सुरू आहे. मात्र एकीकडे देशासह राज्यात गंभीर परिस्थिती असताना पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात चक्क एका दुधाच्या टँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक केली जात असताना हा टँकर पोलिसांनी कात्रज भागात पकडला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्रच खळबळ उडाली आहे.
भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी काल रात्री कात्रज परिसरात टेम्पोतील २९ हजार रुपयांचे बिअरचे १२ बॉक्स पकडले आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालकाला ताब्यात घेत टेम्पो जप्त करून भारती विद्यापीठ पोलिसांकडे देण्यात आला आहे.
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा जसे दूध, भाजीपाला, किराणा वस्तू आणि मेडिकल सेवा सुरू असून त्यांना पोलिसांकडून पास देण्यात आले आहेत. तर जागोजागी पोलिसांची गस्त देखील सुरू आहे. काल रात्री भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस कात्रज घाट परीसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार पारखी, तोंडे यांच्यासह पोलीस नाईक भिंगारे यांना एक दुधाचा टेम्पो संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबविले. चालकाकडे चौकशी केली असता तो खोट बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये दुधाच्या कॅरेटच्या पाठीमागे ठेवलेले २९ हजार रुपयांचे १२ बिअर बॉक्स सापडले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.