पिंपरी चिंचवड ‘कंटेनमेंन्ट झोन’ म्हणून घोषित, शहराच्या सर्व सीमा आज रात्रीपासून बंद..!

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड शहर ‘कंटेनमेंन्ट झोन’ घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार आज रविवार पासून दि.२७ एप्रिलपर्यंत शहराच्या सर्व सीमा बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील १० दिवसामध्ये कोरोना कोविड -१९ रुग्णाची संख्या मोठया प्रमाणावर वाढत आहे. तसेच लगतच्या पुणे शहरात देखील रुग्ण संख्या मोठया प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात स्थानिक प्रसार स्टेज न रहाता सामुदायिक प्रसार (Community Transfer Stage) सुरू होण्याची शक्यता असल्याने वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी शहरातील नागरिकांच्या हालचालीवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील संपुर्ण भाग रविवार दिनांक १९ एप्रिल २०२० रात्री १२:०० वाजले पासून कंटेनमेंन्ट झोन म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  आज  घोषित केला. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व सीमा व शहरातून बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार संबधीत पोलिस प्रमुख हे या भागाच्या हद्दी सील करतील हे आदेश दि. २७ एप्रिल २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. तदनंतर परिस्थितीचा आढावा घेवून जनतेच्या व्यापक हिताचा विचार करुन उचित निर्णय घेण्यात येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.