पिंपरी (zunjarzep.in):- पिंपरी चिंचवड शहरात अवैद्य दारू विक्री करणाऱ्या ६ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून ७ लाख ८० हजार ३७४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ९३ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देशात ‘लॉकाडाऊन’ लागू करण्यात आला आहे. तर राज्यात केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्रीच चालू ठेवण्यात आली आहे. सर्वत्र मद्य विक्रीस मनाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात आली. आज दि.१ रोजी अवैध दारू विक्री करणाऱ्या ६ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून ७ लाख ८० हजार ३७४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ९३ व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

