कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असलेला परिसर सील करण्यात आला असून, पोलिसाकडून कर्फ्यू लावण्यात आला आहे़. त्यामुळे प्रतिबंधित केलेल्या भागात जीवनाश्यक वस्तू व सेवा पुरविणारी दुकाने दिवसभरातून केवळ सकाळी १० ते १२ या वेळेत दोन तासच चालू असणार आहेत. त्यादरम्यानच नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. मात्र यावेळेस सर्वांनी सोशल डिस्टंन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. जे कोणी नियम पाळणार नाहीत, त्यांची दुकाने बंद करण्याचा इशारादेखील पोलिसांनी दिला आहे.
दूध व दुग्धोत्पादन, किराणा सामान, फळे व भाजीपाला इत्यादी वस्तू पुरविणाऱ्या दुकानांच्या ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी जाणीवपूर्वक गर्दी टाळावी. त्यासाठी आवश्यक सामाजिक अंतराचे भान ठेवावे.

