Pune : संचारबंदीचे पालन न करणाऱ्या 153 जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हे दाखल

0 झुंजार झेप न्युज

संचारबंदीचे पालन न करणाऱ्या 153 जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच नागरिकांची वाहने देखील जप्त करण्यात येत आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात संचारबंदी, जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलिसांकडून या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जात आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत घराबाहेर फिरणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या 153 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
तसेच नागरिकांची वाहने देखील जप्त करण्यात येत आहेत.
आरोपींना पोलीस तात्काळ न्यायालयात हजर करत असून न्यायालय संबंधितांना दंड अथवा कैदेची शिक्षा सुनावत आहे. संचारबंदी सुरू असताना नागरिकांनी संचार बंदीचे उल्लंघन केल्यास संबंधितांना पोलिसांकडून दिले जाणारे दाखले आणि परवाने भविष्यकाळात मिळणार नाहीत, असे पुणे ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.