#पुणे# पुणे -सोलापूर महामार्गावर तीन भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

पुणे -सोलापूर महामार्गावर तीन भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू 

वाखारी (ता. दौंड) येथील समाधान हॉटेल समोर महामार्गावर पायी चालणाऱ्या एका युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुणे : यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर रात्री झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. तर तीन ते चार लोक गंभीर जखमी झाले आहेत रात्रीच्या सुमारास हे अपघात झाले आहेत. चालकांच्या बेफिकीरी पाऊस  आणि खड्डे अपघातास जबाबदार ठरले आहेत.

वाखारी (ता. दौंड) येथील समाधान हॉटेल समोर महामार्गावर पायी चालणाऱ्या एका युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कासुर्डी (ता. दौंड) येथील शेरू ढाबा येथे एक कंटेनर चालक  थांबला.असता  त्याने आपल्या ताब्यातील वाहन बेफिरीने रस्त्यातच उभे केल्याने त्यास एका कारची मागून  धडक बसली. यात कारमधील  पाच जणांचा  मृत्यू झाला.आहे  तर तिसऱ्या ठिकाणी  सहजपूर (ता. दौंड) गावच्या हद्दीत झाला.


अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्यावर एक मोठा खड्डा पडलेला आहे. या खड्ड्यात गॅस वाहक कंटेनरचे पुढील चाक गुंतल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे हा कंटेनर दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेकडील रस्त्यावर गेला. त्यास त्या रस्त्याने जाणाऱ्या दोन कार या वाहनास धडकल्या. त्यात एकाचा जागीच तर एकाचा रूग्णालयात मृत्यू झाला. रात्रीच्या  सुमारास झालेल्या या तीनही अपघातांची माहिती मिळताच यवत पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती रात्रीच्या वेळी पावसाचा जोर अधिक असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

Follow us in-


Instagram -

Twittr-

Fecebook -



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.