रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
फ्लॉवर 120, कोथिंबीर 100 तर टोमॅटो 80 रुपये किलो, नागपुरात भाजीपाल्याचे दर गगनाला
पावसामुळे भाज्यांची आवक घटल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. नागपूरच्या बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले.
नागपूर : नागपुरात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत (Vegetable Price Hike). पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. आठ दिवसांत किरकोळ बाजारात भाज्या दुप्पट महाग झाल्या आहेत. भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. आणखी 15 ते 20 दिवस भाज्यांची महागाई कायम राहणार आहे.
पावसामुळे भाज्यांची आवक घटल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. नागपूरच्या बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले.
सध्या नागपुरातील रामदारसपेठ भाजी बाजारात फुलकोबी 120 रुपये, दोडका 120 रुपये, मेथी 160 रुपये, कोथिंबीर 100 रुपये, टोमॅटो 80 रुपये, तर वांगी 70 ते 80 रुपये किलोवर जाऊन पोहोचली आहे.
भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फटका बसतो आहे. शिवाय, या महागाईमुळे कोरोनाच्या संकटातसर्वसामान्यग्राहकांचं बजेटंही बिघडलं आहे. आणखी 15 ते 20 दिवस भाज्यांची महागाई कायमराहणारअसल्याचं व्यापाऱ्याचं मत आहे.
Follow us in
Instagram-
https://instagram.com/zunjarzepnews?igshid=2d6usmsmid25
Twittr -
https://twitter.com/ZunjarZep?s=09
Fecebook-
https://www.facebook.com/zunjarzepnews/

