#breking news पुण्यातील हडपसरमध्ये 18 पिस्तुलं आणि 27 जिवंत काडतुसे जप्त!

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

पुण्यातील हडपसरमध्ये 18 पिस्तुलं आणि 27 जिवंत काडतुसे जप्त!

पुण्यातील हडपसरमध्ये पोलिसांनी गावठी बनावटीचे 18 पिस्तुलं आणि 27 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी सहा जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गावठी बनावटीचे 18 पिस्तुल आणि 27 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी सहा जणांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याविरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हडपसर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना त्यांनी संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या अरबाज खान याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता एक पिस्तुल सापडलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करुन अधिक चौकशी केली. यानंतर त्याने इतर आरोपींची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी इतर आरोपींना अटक करुन पिस्तुल जप्त केली. या सर्व पिस्तुलांची किंमत 5 लाख 68 हजार इतकी आहे.


अरबाज खान, सूरज चिंचणे, कुणाल शेजवळ उर्फ यश, जयेश गायकवाड, विकास भगत तौर उर्फ महाराज आणि शरद बन्सी मल्लाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेत असलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुण्यासह ग्रामीण पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यातील अनेकांवर पिस्तुल तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.


आरोपींनी एवढा मोठा शस्त्रसाठा कशाला आणला होता? कोणाला दिला जाणार होता? की काही घातपात करायचा होता याचा तपास हडपसर पोलीस करत आहेत



 (विशेष सूचना)

झुंजार झेप )-   प्रसिद्ध झालेली बातमी संपादक सहमत असतीलच असे नाही.

Follow us in-


Instagram -

Twittr-

Fecebook -



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.