#breking news# pimpri-chinchwadपिंपरी (झुंजार झेप ) दि. १६ सप्टेंबर २०२० – शहरामध्ये वाढता कोविड – १९ चा पादुर्भाव लक्षात घेता नागरिकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करणेकामी सार्वजनिक परिसरामध्ये थुंकणा-या व्यक्तींविरुध्द रक्कम रुपये १ हजार इतका दंड आकारणे यासह पिंपरी चिंचवड शहरातील

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308


पिंपरी (झुंजार झेप ) दि. १६ सप्टेंबर २०२० – शहरामध्ये वाढता कोविड – १९ चा पादुर्भाव लक्षात घेता नागरिकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करणेकामी सार्वजनिक परिसरामध्ये थुंकणा-या व्यक्तींविरुध्द रक्कम रुपये           १ हजार इतका दंड आकारणे यासह पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी येणा-या सुमारे             १५ कोटी २३ लाख रूपयांच्या खर्चास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.

पवना धरणातून से.क्र.२३ जलशुध्दीकरण केंद्र निगडी पर्यंत पाणी आणणेसाठी थेट पाईपलाईन टाकणेच्या प्रकल्पासाठी सल्लागार नेमणूकीकामी आज मान्यता देण्यात आली.

चिंचवड येथील मंगलमुर्ती वाडा, चाफेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदिर पासूनचे थेरगाव बोटक्लब पर्यंतचा परिसर सुशोभिकरण करणेकामी येणा-या सुमारे ९ कोटी १ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची सफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी २९ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

सुरक्षा विभागामार्फत ठेकेदारी पध्दतीने सुरक्षा व्यवस्था या उपक्रमान्वये सुरक्षा व्यवस्था करणेकामी          येणा-या सुमारे ५५ लाख ७ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

  मनपाचे विविध विभागास आवश्यक छपाई साहित्य खरेदीकामी येणा-या सुमारे १ कोटी २२ लाख २५ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 प्रभाग क्र. २०, ३०, ३१ व ३२ प्रभागासाठी १३२८ सार्वजनिक शौचालय व मुता-यांची यांत्रिकी पध्दतीने व मनुष्यबळाव्दारे दैनंदिन साफसफाई, देखभाल व किळकोर दुरुस्ती करणेकामी येणा-या सुमारे ३० लाख ६१ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी काविड १९ आपत्ती व्यसस्थापन करीता प्रकाश व्यवस्था, जनित्रसंच, सी.सी.टीव्ही व अन्य विद्युत विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे २९ लाख ३ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

#pimpri chinchwad #pune #zunjarzep 

Follow us in-

Instagram -@zunjar zep

Twittr -@zunjar zep

Fecebook -@zunjar zep



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.