रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
अतिक्रमणाच्या वादातून सरपंचाकडून महिलेस मारहाण, धुळे जिल्ह्यातील पेरेजपूर येथील घटना
एकीकडे सरपंचाने महिलेस मारहाण केली म्हणून सरपंचावर टीका होत असतांना त्याच सरपंचाच्या समर्थनार्थ पेरेजपूर गावातीलच काही महिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घालून महिलेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सरपंच मनोज देसले यांनी सरपंच या नात्याने समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र या आधी देखील सरपंचांनी त्यांचे अतिक्रमण बांधकाम थांबविल्याचा राग मनात होता. प्रथम त्या महिलेनेच सरपंचांना शिवीगाळ सुरू करून सरपंचाला मारहाण सुरू केल्याचं सरपंच तसेच काही स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. त्या महिलेस समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. या महिलेविरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी मंगळवारी रात्री पेरेजपूरच्या महिलांनी साक्री पोलीस स्टेशनला घेराव घातला होता . सरपंचानी महिलेस मारहाण केल्याचं समर्थन होत नाही . मात्र सोशल मीडियावर या प्रकरणी दोन्ही बाजूने प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
#Dhule #breking news
Follow us in-
Instagram-
https://instagram.com/zunjarzepnews?igshid=2d6usmsmid25
Twittr-
https://twitter.com/ZunjarZep?s=09
Fecebook -
https://www.facebook.com/zunjarzepnews/

