#breking news # मुंबई #घाबरुन जाऊ नका', मुंबईतील संचारबंदीच्या आदेशाबाबत आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

घाबरुन जाऊ नका', मुंबईतील संचारबंदीच्या आदेशाबाबत आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण.

राज्याचे पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत कलम 144 अंतर्गत संचारबंदीच्या आदेशाबाबत स्पष्टीकरण देत नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलंय. 

 मुबंई :(झुंजार झेप )राज्याचे पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत कलम 144 अंतर्गत संचारबंदीच्या आदेशाबाबत स्पष्टीकरण देत नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलंय . तसेच मुंबईत कोणतेही नवे निर्बंध लादण्यात आले नसून आधीच्या आदेशालाच मुदतवाढ दिल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. मुंबई विभागीय पोलीस आयुक्तालयाकडून कलम 144 अंतर्गत आदेश देण्यात आल्यानंतर मुंबईत संचारबंदीच्या चर्चेला उधाण आलं होतं. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.

आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईकरांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. कलम 144 अंतर्गत देण्यात आलेले आदेश 31 ऑगस्टच्या मागील आदेशाला दिलेली मुदतवाढ आहे. नव्याने कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाही. कृपया ही माहिती शेअर करा आणि घाबरु नका.”


दरम्यान, मुंबई विभागीय पोलीस आयुक्तालयाने बुधवारी (16 सप्टेंबर) कलम 144 अंतर्गत आदेश देत 30 सप्टेंबरपर्यंत निर्बंध लावले होते. हे आदेश राज्य सरकारच्या 31 ऑगस्ट रोजीच्या निर्बंध शिथिल करणे आणि टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवण्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार म्हणजेच मिशन बिगन अगेननुसार दिले होते. यात नव्याने कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाही.

हेही वाचा :

मुंबईत झोपडपट्ट्या-चाळींपेक्षा कोरोनाचा बिल्डिंगमध्येच जास्त फैलाव, बीएमसीसमोर मोठं आव्हान

आधी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमीपूजन, आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंबेडकर स्मारकाची पायाभरणी

“बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का?” संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला सवाल

Follow us in-

Instagram -

Twittr-

Fecebook -



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.