#Breking news # नवी दिल्ली#सरकारकडून बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागलाय', संजय राऊतांचा संसदेत हल्लाबोल

0 झुंजार झेप न्युज

  रमेश ब्रम्हा  संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

सरकारकडून बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागलाय', संजय राऊतांचा संसदेत हल्लाबोल



नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून काही केंद्रीय कंपन्या किंवा त्यातील हिस्सा विकण्याबाबतच्या हालचाली सुरु आहे. तसंच सहा कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती देखील आहे. या सर्व प्रकरणांवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारनं बाजारात विक्रीसाठी खुप काही उपलब्ध केलंय. बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागला आहे. आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट देखील आणलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

राज्यसभेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशाची आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे. अशा स्थितीत देशाचा जीडीपी आणि रिझर्व्ह बँक कंगाल झाली आहे. त्यातच एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी आणि बरंच काही सरकारनं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलं आहे. बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागला आहे. आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टदेखील आणलं आहे, असं राऊत म्हणाले.

सरकार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट खासगी कंपनीकडे देण्याचा विचार करत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जगातील सर्वात मोठं बंदर आहे. त्यातून भारत सरकारला 30 टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळतो. असं महत्त्वपूर्ण बंदर खासगी कंपनीच्या हाती देणं राष्ट्री सपत्तीचं मोठं नुकसान असल्याचंही राऊत म्हणाले.

क्या लोग भाभीजी के पापड खा करके ठीक हो गये?'
कोरोनाबाबत आरोग्य मंत्र्यांच्या निवेदनावर बोलताना देखील संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली. संजय राऊत म्हणाले की, माझी आई आणि भावालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. महाराष्ट्रात अनेक लोक करोनातून बरे होत आहेत. आज धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. बृह्नमुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं आहे. काल काही सदस्यांनी महाराष्ट्रावर टीका केली, त्यामुळे मी हे सत्य सांगतोय, असं राऊत म्हणाले. असंख्य लोक कोरोनातून बरे कसे झाले? 'क्या लोग भाभीजी के पापड खा करके ठीक हो गये?' असा टोलाही त्यांनी लगावला.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.