रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
पिंपरी,(झुंजार झेप ) १५ सप्टेंबर २०२० :- कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत देखील जिवाची पर्वा न करता कामावर हजर राहून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्याबद्दल अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कर्मचारी यांना दैनंदिन र.रु. १५०/- प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोना (कोविड-१९) विषाणूचा वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध प्रतीबंधानात्म्क उपाय योजनेअंतर्गत काम केलेल्या कर्मचा-यांना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर येणे-जाणे, जेवण-खाण इ. साठी हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.
Follow us in-
Instagram -
Twittr-
Fecebook -

