रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
Coronavirus | किशोर वयातील मुलांना कोरोनाचा धोका कमी? WHO चं म्हणणं काय?
जीवघेण्या कोरोना व्हायरसवर प्रभावी लस तयार करण्यासाठी जगभरातील अनेक संशोधक प्रयत्न करत आहेत. तसेच संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या या व्हायरसवर इतरही अनेक संशोधनं करण्यात येत आहेत.
मुंबई : जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने सांगितलं की, कोरोना महामारीचा किशोर वयातील मुलांवर फार कमी परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. रिपोर्टनुसार, जगभरात 20 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या 10 टक्क्यांहूनही कमी व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर या वयोगटात 0.2 टक्क्यांहून कमी रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
किशोर वयातील मुलांना कोरोनाचा धोका कमी : WHO
WHO चे प्रमुख डॉक्टर टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस म्हणाले की, 'आम्हाला माहिती आहे की, कोरोना व्हायरसमुळे किशोर वयातील मुलांचा जीव जाऊ शकतो. परंतु, 20 वर्षांहून कमी वय असणाऱ्या मुलांमध्ये कोरोनाची बाधा झाल्याचं प्रमाण कमी आढळून आलं आहे.' पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोना व्हायरसची बाधा होणाऱ्यांमध्ये आणि त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या आकड्यात खूप मोठी तफावत आहे. कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेल्या मुलांमध्ये बऱ्याच काळापर्यंत लपून राहतात. दरम्यान या वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचे गंभीर परिणाम अत्यंत कमी प्रमाणात दिसून येतात. तसेच ते म्हणाले की, लहान मुलांमध्ये आणि तरूणांमध्ये महामारीचा धोका आणि मृतांच्या आकडेवारीचा सखोल अभ्यास करण्यासाठी सखोल संशोधनाची गरज आहे.
20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये मृत्यू दर अत्यंत कमी
WHO ने सांगितल्यानुसार, लहान मुलं आणि किशोर वयातील मुलांमध्ये वेगळ्या प्रकारे कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहायला मिळत आहे. WHO प्रमुखांनी अनेक देशांचं उदाहरण दिलं जिथे आवश्यक न्यूट्रिशन आणि प्रतिरक्षेच्या सेवांवर परिणाम झाला आहे. त्यांनी मुलांच्या हवाल्याने सांगितलं की, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त सरकार आणि कुटुंबालाच नाहीतर संपूर्ण समाजाने घेतली पाहिजे. त्यांना समाजाने चांगली वागणूक देणं गरजेचं आहे. तसेच जिथे अद्याप शाळा सुरु झालेल्या नाहीत, तिथे डिस्टंस लर्निंगमार्फत शिक्षण पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे.
Follow us in-
Instagram -
Twittr-
Fecebook -

