NEET 2020 : आज नीट परीक्षा, विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 'ही' काळजी घ्यावी!

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

NEET 2020 : आज नीट परीक्षा, विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 'ही' काळजी घ्यावी!

लॉकडाऊनमुळं लांबलेली नीट 2020 ची परीक्षा आज रविवारी पार पडत आहे. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे.



पुणे: लॉकडाऊनमुळं लांबलेली नीट 2020 ची परीक्षा आज रविवारी पार पडत आहे. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. दुपारी 2 ते 5 दरम्यान ही परीक्षा होईल. यासाठी विद्यार्थ्यांना दुपारी 11 ते 1:30 दरम्यान प्रवेश दिला जाईल. पुणे शहर आणि जिल्ह्यात 46 केंद्रावर ही परीक्षा पार पडेल. प्रत्येकवर्षी ही परीक्षा मे महिन्यात पार पडते. पण लॉकडाऊनमुळं यंदा ही परीक्षा पुढं ढकलण्यात आली. त्यामुळे नीटची परीक्षा नेमकी घेतली जाणार का? घेतली जाणार असेलच तर ती कधी घेतली जाणार? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात होते. याची उत्तरं अधांतरीच होती. त्यामुळे विध्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती. यावरून अनेकदा राजकारण ही रंगलं, शेवटी न्यायालयाने परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि विध्यार्थी अभ्यासाला लागले. बघता-बघता आता परीक्षा तोंडावर आली. पण आता विद्यार्थ्यांना चिंता सतावत आहे ती त्यांना परीक्षा केंद्रावर कोरोनाची लागण तर होणार नाही ना? त्यामुळेच परीक्षा केंद्रावर त्यांना नेमक्या कोणत्या सुविधा उपलब्ध असतील आणि विद्यार्थ्यांनी सोबत काय न्यायला हवं. याबाबत डीपर संस्थेने विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे.

विद्यार्थ्यांनी न विसरता सोबत न्यायच्या वस्तू


1. अॅडमिट कार्ड
2. एक पासपोर्ट साईज फोटो
3. फोटो ID, शक्यतो आधार कार्ड
4. पाणी बाटली पारदर्शी
5. सॅनिटायझर बॉटल 50 ml

सेंटरवर हे मिळेल


1. तीन लेअर मास्क
2. 1 Gloves
3. 1 पेन


(या वस्तू मिळत असल्या तरीही वरील बाबी स्वतः ही बाळगाव्यात.)


कोविडविषयी सर्व सूचना नीट पाळा


एका वर्गात केवळ 12 विद्यार्थी बसविण्याची तयारी सुरू असल्याने काही प्रमाणावर सेंटर वाढविले जातील.

NTA ने विद्यार्थ्यांना एसएमएस आणि ई-मेल पाठवलेले आहेतच. कदाचित काहींना एसएमएस किंवा ईमेल मिळणार नाही. त्यावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी खबरदारी म्हणून केंद्रावर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आपले सेंटर NTA च्या वेबसाईटवर तपासून घ्यावे.


वेळेचे नियोजन


दुपारी 2 ते 5 पेपर आहे. 1:30 वाजता शेवटची हॉल एन्ट्री आहे. सकाळी 11 पासून केंद्रावर तपासणी आणि Sanitize केले जाईल.


लांब बाह्यांचा शर्ट नको.
मोठ्या बटन्स नकोत.
जोडे घालून जाऊ नये.
चप्पल वापरावी.


परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने वरील उपाययोजना केलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी देखील वरील खबरदारी घ्यायला हवी. त्याबरोबरच केंद्रावर येताना आणि घरी जाताना देखील आपण कोरोना बाधितांच्या संपर्कात येणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे.

Follow us in-

Instagram -@zunjarzep

Twittr -@झुंजार झेप 

fecebook-@zunjarzep

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.