विहामांडवा येथील आठ दिवसापासून बेपत्ता तरुण एका शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला
पैठण प्रतिनिधी:पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या वीस वर्षीय अविवाहित तरुणांचा मृतदेह विहामांडवा शिवारातील एका शेतात झाडाला लटकलेला आढळून आल्यामुळे विहामांडवा परिसरात एकच खळबळ उडाली असून पाचोड पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहे
पाचोड पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार विहामांडवा येथील अर्जुन हनुमंत गावंडे ( २० ) हा अविवाहित तरुण आठ दिवसापासून विहामांडवा येथून बेपत्ता होता याबाबत अर्जुन गावंडे बेपत्ता असल्याची तक्रार पाचोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती यावेळी पाचोड पोलिस स्टेशन चे सपोनि अतुल येरमे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड , सहाय्यक फौजदार संजय मदने , पोलिस जमादार आप्पासाहेब माळी, अर्जुन गावंडे याचे मित्र, नातेवाईक यांच्या मदतीने विहामांडवा व परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला पण अर्जुन गावंडे हा काही मिळून आला नाही
शुक्रवारी दुपारी विहामांडवा शिवारातील आनंता काळे यांच्या शेतात अर्जुन गावंडे याची मोटारसायकल शेतातील कपाशीचे पिकात दिसून आल्याने त्याचा सदर शेतात शोध घेतला असता उसाच्या व कपाशी, तुरीच्या पिकाच्या मधोमध असलेल्या लिंबाच्याचा झाडाला मृतदेह लटकलेला आढळून आला आहे या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना व अर्जुन गावंडे यांच्या नातेवाईकांना मिळाली यावेळी पाचोड पोलिस स्टेशन चे सपोनि अतुल येरमे व पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड यांनी आनंता काळे यांच्या शेतात दाखल झाले यावेळी अर्जुन गावंडे यांचा मृतदेह झाडावरून खाली उतरून पंचनामा करून जागीच पी एम करण्यात आले ... पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सपोनि अतुल येरमे , पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड सहाय्यक फौजदार संजय मदने व आप्पासाहेब माळी करीत आहे.

