पिंपळे सौदागर येथे नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर व कोरोना योद्धाचा सन्मान
लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक नाना काटे यांनी केले आयोजन
लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक नाना काटे यांनी केले आयोजन
पिंपळे सौदागर, :-लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निम्मित माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक काटे व नगरसेविका शितल काटे व नाना काटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने रक्तदान शिबिर व विविध क्षेत्रातील कोरोना योद्धाचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळे सौदागर येथील महादेव मंदीर सभागृह करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, ज विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, पिपंरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक श्री विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शितल नाना काटे, माजी नगरसेवक शंकर काटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधर वाल्हेकर, पीसीएमटीचे माजी सभापती दिलीप बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विशाल भालेराव व परिसरातील नागरीक व ग्रामस्थ तसेच नाना काटे सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना परिस्थितीमुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, अगदी काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक नाना काटे यांनी लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. परिसरातील नागरिकांनी देखील शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला. तसेच कोरोनाच्या काळात डॉक्टर,नर्स, सफाई अधिकारी,कर्मचारी यांनी कोणतीही भीती ना बाळगता काम केले. यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने ससन्मानित करण्यात आले.

