वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार लोकांनी केला आणि आज तेच उमेदवार जेव्हा पक्षाला आणि आदरणीय बाळासाहेबांना गद्दार होतात तेव्हा त्या गद्दार नेत्यांवर लोकांचा रोष उफाळून आल्या शिवाय राहत नाही.
नांदेड:कोणी बायकोचं मंगळसुत्र विकून तर कोणी मुलीच्या लग्नाचे पैसे देऊन तर कोणी मुलांच्या शिक्षणाचे पैसे देऊन तर कोणी म्हाताऱ्या आई वडिलांच्या दवाखान्याच्या उपचाराचे पैसे पक्षाला देऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार लोकांनी केला आणि आज तेच उमेदवार जेव्हा पक्षाला आणि आदरणीय बाळासाहेबांना गद्दार होतात तेव्हा त्या गद्दार नेत्यांवर लोकांचा रोष उफाळून आल्या शिवाय राहत नाही.याचीच प्रचिती म्हणून आज नांदेड मधे वंचित आघाडीच्या युवा कार्यकर्त्यांनी आमदार यशपाल भिंगे यांच्या बॅनरवर शाही लावून आपला रोष व्यक्त केला.अशी गद्दारी जर भविष्यात कोणी करू पाहत असेल तर "खबरदार" बाळासाहेबांचे सैनिक त्या गद्दारांना सोडणार नाहीत.अँड.बाळासाहेब आंबेडकर हा राजकारणाचा नाही तर वंचित,पीडित,शोषित,बहुजनांच्या काळजाचा विषय आहे.
विशेष सूचना
.(झुंजार झेप )- प्रसिद्ध झालेली बातमी संपादक सहमत असतीलच असे नाही.

