पिंपरी-चिंचवडमधील पोलिस महिलेने अनैतिक संबंधातून निगडीतील तरूणाचे थेरगावमधून केले अपहरण; खंडणीपोटी मागितली किडनी

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी-चिंचवडमधील पोलिस महिलेने अनैतिक संबंधातून निगडीतील तरूणाचे थेरगावमधून केले अपहरण; खंडणीपोटी मागितली किडनी

पिंपरी, दि. ११– पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस शिपाई असलेल्या महिलेने पुण्यातील एका पोलिसांसह स्वतःची आई आणि अन्य चार जणांना सोबत घेऊन निगडीतील एका तरूणाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरणानंतर खंडणीपोटी संबंधित तरूणाकडे दहा लाख रुपये किंवा किडनी देण्याची मागणी करण्यात आली. ५ डिसेंबर रोजी भरदिवसा घडलेल्या या अपहरणामुळे खळबळ उडाली आहे.

सूरज असगर चौधरी (वय २१, रा. ओटास्कीम, निगडी) असे अपहरण, मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून महिला पोलीस शिपाई मनीषा साळवे, पोलीस शिपाई विजय कुमार साळवे, नंदकुमार कांबळे, आक्की लोंढे, सनी लोंढे, विनय लोंढे, मनीषा साळवेची आई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पोलीस शिपाई मनीषा साळवे ही पोलिसांच्या पिंपरी वाहतूक शाखेत कार्यरत आहे. दुसरा आरोपी विजय साळवे हा पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहे. आरोपी मनीषा हिचे आणि फिर्यादी सूरजचे अनैतिक संबंध होते. मनीषा हिने सूरजकडून काही पैसे घेतले होते. ते पैसे देण्यासाठी आरोपीने सूरजला ५ डिसेंबर रोजी थेरगाव येथील रॉयल कोर्ट सोसायटीसमोर बोलावून घेतले. त्यानुसार तो सकाळी सव्वादहा वाजता बोलावलेल्या ठिकाणी गेला. त्यानंतर आरोपींनी सूरजला एका गाडीत जबरदस्तीने बसवून इंदापूरजवळ असलेल्या जंगलात नेले.

तिथे त्याला लाकडी दांडक्याने, कोयत्याने मारहाण केली. दरम्यान आरोपींनी सूरजचा मोबाईल फोन काढून घेतला. मनीषा हिने सूरजसोबत असलेले फोटो आणि व्हिडिओ नष्ट करण्याच्या उद्देशाने सूरजचा मोबाईल फोन फोडून फेकून दिला. त्यानंतर आरोपींनी सूरजकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. दहा लाख रुपये दे नाहीतर तुझी किडनी दे, अशी मागणी करत धमकी दिली. हा प्रकार ५ डिसेंबर रोजी सकाळी सव्वादहा ते दुपारी तीन या कालावधीत घडला. याबाबत आठवडाभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.