ड्रग्जचा व्यापार करणारी महिला गजाआड; कोटींची बंगला, हिऱ्याचे दागिने असा होता थाट
.ड्रग्जचा व्यापार करणारी महिला गजाआड; कोटींची बंगला, हिऱ्याचे दागिने असा होता थाट
.पुण्यातील या महिलेने देशभरात ड्रग्जचा मोठा व्यापार सुरू केला होता. यामध्ये अनेक पार्ट्यांमध्ये ती ड्रग्ज पुरवित होती.
इंदूर, 10 डिसेंबर : ड्रग्ज विरोधी अभियानात इंदूरमधील पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी एका अशा महिलेला पकडलं आहे, जी ड्रग्जच्या मोठ्या व्यवसायाशी संबंधित आहे. पोलिसांनी स्कीम-78 येथील निवासी प्रिती जैन उर्फ काजल उर्फ सपना आंटीला ड्रग्ज सप्लाय करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
या महिलेने शहरातील अनेक पब, रेस्टॉरंट्स, कॅफे, पूल क्लब आणि जिममध्ये ड्रग्ज पुरवल्याची कबुली दिली आहे. गोवा आणि मुंबई येथील नायजेरियन तस्करांशीही तिचा संबंध आहे. विजयनगर पोलीस ठाण्यात 2 दिवसांपूर्वी पकडलेल्या ड्रग पेडर्सकडून या आंटीची माहिती मिळाली. महिलेने मोठमोठे बिल्डर, व्यापारी आणि पब ऑपरेटर नशेचं व्यसन लावलं आहेत. ही महिला महिन्याला सुमारे 10 लाख रुपयांच्या ड्रग्जची विक्री करते.
