मोशीत व्यावसायिकांकडून तब्बल साडे बारा किलो प्लास्टीक जप्त; २५ हजारांचा दंड वसूल…

0 झुंजार झेप न्युज

मोशीत व्यावसायिकांकडून तब्बल साडे बारा किलो प्लास्टीक जप्त; २५ हजारांचा दंड वसूल…


पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग व भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वतीने प्लास्टीक बंदी बाबत केलेल्या कारवाईत मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यावसायिकांकडून साडे बारा किलो प्लास्टीक जप्त करुन २५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, विजय दवाळे, पोलिस निरिक्षक गिरणार, भांडे, आरोग्य निरिक्षक अंकुश झीटे, वैभव कांचनगौडा, आरोग्य मुकादम रविंद्र गायकवाड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या क प्रभाग व भोसरी पोलीस शाखा यांच्यातर्फे संयुक्तरित्या बाजार समिती मोशी मार्केट येथे केलेल्या कारवाईत सुमारे ४० व्यावसायिकांची तपासणी करणेत आली. त्यातील ५ व्यावसायिकांकडुन बंदी असलेल्या प्लॅस्टीक वापराबाबत सुमारे २५ हजार प्रशासकीय शुल्क वसुन करुन सुमारे १२.५ किलो प्लॅस्टीक जप्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.