भारताने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय

0 झुंजार झेप न्युज

 

भारताने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय

सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 2020) यांच्यात आज (मंगळवार) तिसरा आणि अखेरचा टी-ट्वेन्टी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.  दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सिडनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट ग्राऊंडवर या सामन्यात सुरुवात होईल. तिसऱ्या मॅचसाठी भारताने संघात कोणताही बदल केलेला नाही. (Ind vs Aus 2020 india vs australia 3rd t 20 live score update)

पहिले दोन्ही टी-ट्वेन्टी सामने जिंकत भारताने 3 सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. आता अखेरचाही टी-ट्वेन्टी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला क्लिनस्विप देण्याचा भारताचा निर्धार असेल तर शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.

पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने धूळ चारत मालिका  2-0 ने खिशात घातली. त्यामुळे तिसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरण्याअगोदर भारताचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. याउलट पहिले दोन्ही सामने गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास डळमळीत असेल. शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी करुन सामना जिंकण्याचं आव्हान ऑस्ट्रेलिया संघासमोर असेल.

दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय

दुसऱ्या टी-ट्वे्न्टी सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने टी 20 मालिकाही जिंकली. टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 2 चेंडूआधी पूर्ण केलं. टीम इंडियाकडून शिखर धवनने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 22 चेंडूत नाबाद 42 धावांची निर्णायक खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीनेही 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्स, अँड्रयू टाय, मिचेल स्वीपसन आणि अॅडम झॅम्पा या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 11 रन्सनी विजय

पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात टी नटराजन आणि युजवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने बाजी मारली होती. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव केला होता. भारतानं दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सात बाद 150 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. भारताकडून नटराजननं 30 धावात 3 विकेट्स घेतल्या होत्या.

टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू समॅसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, टी नटराजन आणि शार्दुल ठाकुर.

ऑस्ट्रेलिया: एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एलेक्स कॅरी, जोश हेजलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सैम्स, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट, अॅडम झॅम्पा, मिशेल स्वेपसन आणि नॅथन लायन.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.