दिल्ली बॉर्डरवर पोहोचले हजारो शेतकरी, आज मोठ्या आंदोलनाची शक्यता

0 झुंजार झेप न्युज

दिल्ली बॉर्डरवर पोहोचले हजारो शेतकरी, आज मोठ्या आंदोलनाची शक्यता

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात आज शेतकऱ्यांचं सिघु बॉर्डरवर एक दिवसीय उपोषण असणार आहे. दिल्ली नजीकच्या बॉर्डरवर हे उपोषण करण्यात येणार असून यासाठी अनेक शेतकरी हे उपोषणाला बसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर उपोषणाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही पाठींबा आहे. अरविंद केजरीवालसुद्धा उपोषणाला बसणार आहेत. 

या उपोषणासाठी दिल्ली बॉर्डरजवळ आणखी 10 हजार शेतकरी पोहोचले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत मोठ्या आंदोलनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीच्या बदरपूर पळवलसारख्या बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन करत आहे. एकीकडे उपोषणाला सुरुवात होणार असून दुसरीकडे उत्तरप्रदेश, हरियाणा, उत्तराखंडचे शेतकरी संगठन केंद्र सरकारसोबत वार्ताच्या तयारीत आहेत. शेतकरी संयुक्त मोर्चाचे भाकियू (भानू) आणि वीएम सिंह यांनी बाहेर पडून सरकारसोबत चर्चा करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता तरी सकारात्मक चर्चा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

खरंतर, कृषी कायद्याविरोधात संपूर्ण देशातून नाराजी पसरत असताना आता भाजप आजपासून उत्तरप्रदेशमध्ये किसान सम्मेलन सुरू करणार आहे. कृषी बिल शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे. हे सम्मेलन 14 डिसेंबर ते18 डिसेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सक्रिय झाले आहेत. या आंदोलनासंदर्भात आपण देशातील इतर पक्षांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भाजप विरोधकांची मोट कशी बांधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात भाष्य केले. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात मी इतर पक्षांसोबत बोलणार आहे. यापूर्वी आम्ही पाच ते सहा राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. आम्ही केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात सांगितलेच आहे, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार यांच्या या भूमिकेचे राष्ट्रीय स्तरावर कशाप्रकारे पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.