महेश लांडगे यांच्या मागणीला यश, पिंपरी-चिंचवडकरांना कोरोनाची लस मोफत मिळण्याची शक्यता!

0 झुंजार झेप न्युज

महेश लांडगे यांच्या मागणीला यश, पिंपरी-चिंचवडकरांना कोरोनाची लस मोफत मिळण्याची शक्यता!

पिंपरी-चिंचवड : कोरोनावरील लस शहरातील सर्व नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. याआधी सर्वात प्रथम भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाकडे नागरिकांना कोरोना लस मोफत देण्यात यावी अशी मागणी केली होती.

यासंदर्भात आमदार लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले होते. लांडगे यांच्या निवेदनानंतर आता महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेते, संबंधित विभागाचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये यासंदर्भात बैठक पार पडणार आहे.

लांडगे यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की, पिंपरी-चिंचवड महापालिका ही आशिया खंडातील सर्वाधिक विकसीनशील महापालिका आहे. शहराचा नावलौकिक आणि विकासामध्ये शहरातील प्रत्येक नागरिकांचे योगदान आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि सुरक्षा देणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वस्तरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत आणि प्राधान्यक्रमाने मिळाली पाहिजे. यासंदर्भात महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेते, संबंधित विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी यांची तात्काळ बैठक आयोजित करावी.

शहराची लोकसंख्या सुमारे 27 ते 30 लाखांच्या घरात आहे. त्यादृष्टीने लसीकरण मोहिमेचे सूक्ष्म नियोजन मनपा स्तरावर करावे लागणार आहे. नागरिकांचे आरोग्याचे हित लक्षात घेता आगामी अर्थसंकल्पामध्ये (2021-22) तरतूद करून महापालिकेच्या रुग्णालयामध्ये प्रभागस्तरावर मोफत लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

यासंदर्भात बोलताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर म्हणाले की, आम्ही लसीकरणाची व्यवहार्यता आणि आर्थिक भार तपासू. सध्या हे स्पष्ट नाही की, सरकार हे पुरवेल की नाही. सभासद व पक्षाच्या नेत्यांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.