पालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडून मुदतवाढ…

0 झुंजार झेप न्युज

 

पालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडून मुदतवाढ…

पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण, मागासवर्गीय, दिव्यांग कल्याणकारी व इतर विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यासाठी अर्ज स्वीकृतीकरिता २५ नोव्हेंबरपर्यंत एक महिन्याची मुदत होती. त्याला आता २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी शुक्रवारी (दि. ४) दिली.

लॉकडाऊनमुळे अनेकांना आवश्यक कागदपत्रे जमा करता आली नाहीत किंवा उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे कल्याणकारी योजनांच्या अर्ज स्वीकृतीस मुदतवाढ देण्याची मागणी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी केली होती.

त्यामुळे अर्ज स्वीकृतीस २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज वाटप आणि स्वीकृती शहरातील सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत सुरू आहे. अर्ज मोफत आहेत. अर्ज भरून दिल्यानंतर २० रूपये शुल्क आहे. या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ढोरे व ढाके यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.