सोलापूर-पुणे हायवेवर टेम्पो चालकानं वाहतूक पोलिसाला चिरडलं, जागीच मृत्यू

0 झुंजार झेप न्युज

 

सोलापूर-पुणे हायवेवर टेम्पो चालकानं वाहतूक पोलिसाला चिरडलं, जागीच मृत्यू

पंढरपूर : सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे येथील टोल नाक्याजवळ वाहतूक पोलिसाने टेम्पो चालकाला गाडी थांबवण्यासाठी इशारा केल्याने चालकाने गाडीच अंगावर घातल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली. यात पोलीस नाईक सागर चौबे या वाहतूक पोलिसाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.


सविस्तर वृत्त असे की, आरोपी चालक नवनाथ शिवाजी गुट्टे हा औषधांचे साहित्य आयशर टेम्पोतून (क्र.MH.04. HD. 01 70) घेऊन हैदराबादहून मुंबईकडे जात होता. यावेळी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे येथील टोल नाक्याजवळ पोलीस नाईक सागर चौबे यांनी टेम्पो चालकाला टेम्पो थांबवण्याचा इशारा केला. मात्र, टेम्पो चालकाने वाहन थेट चौबे याच्या अंगावर घातले. यात चौबे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान अपघात घडलेल्या ठिकाणीच उपस्थित असलेल्या वैभव गायकवाड, स्वप्नील तळेकर, गणेश गायकवाड, उमेश भोसले आदी तरुणांनी चालकाला पकडण्यास पोलिसांची मदत केली. चालक नवनाथ शिवाजी गुट्टे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला इतर पोलिसांनी टेम्भुर्णी पोलीस स्टेशनला आणले आहे. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.