सर्वाधिक लोकप्रिय इंजिन असलेल्या गुगल सर्च इंजिनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने गूगलशी संबधीत सर्व सेवांवर परिणाम झाला होता.

0 झुंजार झेप न्युज

 सर्वाधिक लोकप्रिय इंजिन असलेल्या गुगल सर्च इंजिनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने गूगलशी संबधीत सर्व सेवांवर परिणाम झाला होता.

मुंबई : लोकप्रिय सर्च इंजिन गूगल ची ई-मेल सेवा GMai सह अनेक सेवा सोमवारी संध्याकाळी ठप्प झाल्या होत्या. यामुळे युजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. संध्याकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी गूगलच्या वतीने 'गूगल वर्कस्पेस स्टेटस डॅशबोर्ड' वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ठप्प झालेल्या सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच पुढे सांगण्यात आलं होतं की, 'आम्हाला आशा आहे की, लवकरच सर्व युजर्ससाठी सेवा पूर्ववर्त करण्यात येतील. सांगण्यात आलेली वेळ ही अंदाजे देण्यात आली आहे. या वेळेमध्ये बदलही होऊ शकतात.'

गूगलने सांगितलं कारण

गूगल सेवा ठप्प होण्यासंदर्भात गूगलकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. गूगलने म्हटलं आहे की, आज 3:47AM PT वर इंटरनल स्टोरेज कोटाबाबत जवळपास 45 मिनिटांपर्यंत ऑथेन्टिकेशन सिस्टमची समस्या आली. यादरम्यान, यूजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. दरम्यान ऑथेन्टिकेशन सिस्टममध्ये आलेल्या त्रुटी दूर करण्यात आला आहेत. सर्व सेवा पूर्ववर्त करण्यात आल्या आहेत. यूजर्सना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. तसेच घडलेल्या प्रकाराचा अभ्यास करुन भविष्यात पुन्हा असं होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

गूगल सेवा याआधी ऑगस्टमध्ये खंडीत झाल्या होत्या. सोमवारी संध्याकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी गूगलची ईमेल सेवा 'जी-सूट'च्या मुख्य पानावर लोकांना एक मेसेज दिसला. "आम्हाला माहिती आहे की, गूगल सेवा ठप्प झाल्यामुळे यूजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचमुळे यूजर्स जीमेलचा वापर करु शकत नाहीत."

गूगलने जारी दिलेल्या स्पष्टीकरणात पुढे म्हटलं आहे की, याव्यतिरिक्त गूगलच्या इतर सेवा गूगल कॅलेंडर, गूगल ड्राईव्ह, गूगल डॉक्स आणि गूगल मीट यांच्यावरही परिणाम झाला आहे. नेटवर्कशी निगडीत समस्या दाखवणाऱ्या 'डाऊन डिटेक्टर' ने देखील दाखवलं की, गूगलच्या जीमेल आणि यूट्यूब यांसारख्या सेवा खंडीत झाल्या आहेत. गूगल सेवा खंडीत झाल्यानंतर ट्विटरवर लोकांनी आपला राग व्यक्त केला. ट्विटरवर #गूगल आणि #गूगलडाऊन ट्रेंडमध्ये होता. जवळपास 13 लाखांहून अधिक ट्वीट हे हॅशटॅग वापरुन करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.