भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत येणार? अजितदादा म्हणाले, ‘वारं बदललं’!

0 झुंजार झेप न्युज

पुण्यातले भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना ‘आता वारं बदललंय,’ असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

पुणे : पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा आहेत. नाराज नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्याही बातम्या राजकीय वर्तुळात फिरत आहेत. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता, त्यांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं. ‘आता महाराष्ट्रात वारं बदललेलं आहे,’ असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

गेल्या दोन आठवड्यापासून पुण्यातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. पुणे महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने पुण्यातील राजकीय वातावरण देखील तापलं आहे. आज अजित पवार संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग संदर्भात बैठकीसाठी पुण्यात आले असता पत्रकारांनी त्यांना याचविषयी विचारलं असता अजितदादांनी जोरदार फटकेबाजी केली. 

अजित पवार म्हणाले, “मागील काळात नरेंद्र मोदी यांचा झंझावात पाहायला मिळाला. देशात भाजपची सत्ता आली. अनेक राज्यांत मोदींमुळे भाजप सत्तेत आलं. परंतु आता महाराष्ट्रात वातावरण बदललेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्याने राज्यातली राजकीय समीकरणे बदलली आहेत. जर कुणी आपल्या प्रभागाचा आणि वॉर्डाचा विकास व्हावा म्हणून जर त्यावेळी गेले असतील आणि आता जर वेगळा विचार करुन परत येण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांचा स्वार्थ नाही कारण फक्त ‘विकास’…”, अशी जोरदार राजकीय फटकेबाजी अजित पवार यांनी केली.


“वार बदललं की काही जण बदलत असतात. राजकारणात काम करताना वेगवेगळे टप्पे येत असतात. अनेक जण अनेक वेळा वेगळे निर्णय घेत असतात… मागे आमच्या पक्षामधल्याच काही जणांनी भाजपमध्ये उड्या मारल्या. उड्या मारणाऱ्या नेत्यांना पक्षनिष्ठा वगैरे काहीही नसतं”, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

धनंजय मुंडेंची नाहक बदनामी – अजित पवार

धनंजय मुंडे यांच्याविरोधातली बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना याप्रकरणी मोठा दिलासा मिळालेला आहे. याचप्रकरणी अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले,

“एखादी राजकीय व्यक्ती काम करत प्रचंड काम करावं लागतं, कष्ट घ्यावे लागतात. पण असं जेवढं घडतं तेव्हा त्याला त्याच्या पदावरुन एक क्षणात पायउतार व्हावं लागतं. याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्या विरुद्ध वक्तव्य केलं त्याला जबाबदार कोण?, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

“बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी, तो बदनाम होतो, त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतं त्याला वाली कोण? आम्ही पाठीशी घालतोय असे आरोप झाले, आम्ही संपूर्ण तपास होऊ द्या सत्य बाहेर येऊ द्या म्हणत होतो पण धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी झाली”, असंही अजित पवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.