चंद्रकातंदादांचं गणित कच्चं, भाजप शेवटून एक नंबरचा पक्ष, अब्दुल सत्तारांचा टोला

0 झुंजार झेप न्युज

भाजप खोटी आकडेवारी देणारा पक्ष असल्याचं आहे. चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं आहे, असं अब्दुल सत्तार म्हणाले. 

धुळे : राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रमापंचायत निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी त्यांचा दावा फेटाळला आहे. भाजप खोटी आकडेवारी देणारा पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं असून भाजप शेवटून पहिला येणारा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे गणित कच्चं आहे. भाजकडून खोटी आकडेवारी सांगितले जाते. राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हा शेवटून एक नंबर आलेला पक्ष आहे,” असं अब्दुल सत्तार म्हणाले. 

दरम्यान, राज्यात 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. 18 जानेवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होत नसल्यामुळे कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायती मिळाल्या हे सांगणं कठीण आहे. मात्र, निकाल हाती आल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपणच सर्वात चांगली कामगिरी केल्याचा दावा केला होता.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपने 6 हजार जागा जिंकल्याचा दावा केला होता. तर काँग्रेसनेही 4 हजार जागा जिंकल्याचं म्हटलं होतं. दुसरीकडे आमचाच पक्ष राज्यात एक नंबर राहिल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. त्यांनतर आता उब्दुल सत्तार यांनी चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा नंबर शेवटून पहिला आल्याची मिश्किल टिप्पणी केली.

लवकरच सरपंचपदाची सोडत जाहीर होणार

ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या असल्या तरी अजून संरपंचपदाची जागा नेमकी कोणासाठी सुटणार हे अजूनही स्पष्ट नाही. येत्या काही दिवसांत हे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा संग्राम अजूनही संपलेला नाही. आगामी काळात पालिका, जिल्हा परिषदा, सहकारी बँकांच्या निडणुका होणार आहेत, त्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचयातील ताब्यात कशा येतील त्यासाठी पक्षांची खलबतं सुरू झाली आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.