उद्या मलाही ईडीची नोटीस येऊ शकते: रोहित पवार

0 झुंजार झेप न्युज

त्यांनी ‘ईडी’कडून राजकीय नेत्यांना पाठवण्यात येणाऱ्या नोटिसांविषयी शंका उपस्थित केली. हा राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रकार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

नवी मुंबई: भाजप सक्तवसुली संचलनालयाचा (ED) वापर करुन विरोधकांना लक्ष्य करत आहे. कदाचित उद्या मलाही ‘ईडी’ची नोटीस येऊ शकते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले.

 ते मंगळवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘ईडी’कडून राजकीय नेत्यांना पाठवण्यात येणाऱ्या नोटिसांविषयी शंका उपस्थित केली. हा राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रकार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. तेव्हापासून शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून ‘ईडी’च्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतात’

महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतात. पण तशा वाटाघाटी आणि समीकरणे जुळून आली पाहिजेत. पदवीधर आणि विधान परिषद निवडणुकीत एकत्रित ताकद मोठी असल्याचे दिसून आले. त्यामुळे आगामी काळातही भाजपाच्या विचारधारेला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित लढेल. पण शेवटी हा निर्णय तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घेतील, असे रोहित पवार यांनी सांगितले.

रोहित पवार पहाटे चार वाजता APMC मार्केटमध्ये

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कामाचा धडाका संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. कामाची पाहणी असो वा उद्घाटन, अजितदादा न चुकता वेळेवर पोहोचतात. अजित पवारांच्या कामाची पद्धत त्यांचा पुतण्याही फॉलो करताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही भल्या पहाटे नवी मुंबई एमपीएमसी मार्केट गाठले.

रोहित पवारांनी ठिकठिकाणी थांबून व्यापारी आणि शेतकऱ्यांची विचारपूस केली. शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये येणाऱ्या अडचणी येत्या अधिवेशनात मांडणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

संजय राऊतांनंतर शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्यापाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक नेता सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. हा नेता शिवसेनेचा माजी खासदार असून अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या एका स्थानिक नेत्याचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) आणी PMC बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी PMC Bank Fraud) या नेत्याची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.