पोलिसांसाठी महाराष्ट्रात एक लाख घरे; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

0 झुंजार झेप न्युज

वेगवेगळ्या पद्धती वापरुन पोलीस विभागातूनच घर बांधली जाईल, असेही अनिल देशमुख म्हणाले.

मुंबई : महाराष्ट्रातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. नागपूरमध्ये पोलिस महासंचालक शिबीर कार्यालयासह पाचपावली आणि इंदोरा येथील पोलीस अमलदारांचे शासकीय निवासस्थान उद्धाटन केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

राज्यात पोलिसांसाठी घरं कमी आहेत. त्यामुळे ते बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देत असेल, तर त्याला त्याला 4 एफएसआय आणि इतर सुविधा देण्याचा विचार सुरु आहे. ही सर्व घरं पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या नावानेच बांधली जाणार आहेत. जवळपास एक लाख घरं महाराष्ट्र पोलिसांसाठी बांधण्याची तयारी आम्ही केली आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

कोरोनामुळे राज्य शासनाच्या भरवशावर राहून घर बांधली जाऊ शकणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरुन पोलीस विभागातूनच घर बांधली जाईल, असेही अनिल देशमुख म्हणाले.

येत्या 26 तारखेपासून जेल टुरिझमला सुरुवात होईल. येरवडा जेलसोबत महात्मा गांधींच्या आठवणी आहे. येरवडानंतर इतर जेलमध्ये सुद्धा हे करण्यात येणार आहे. जेल कसा असते याची उत्सुकता नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना असते. त्यामुळे हे सुरु करण्यात येत आहे, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

आणखी अद्यावत ड्रोन आणणार

डिजी आणि सीपी कार्यालय हे फडणवीस सरकारने केलं आहे. आम्ही फक्त रिबीन कापतो आहे. त्यामुळे कधी त्यांनी केलेल्या कामचं आमच्या हस्ते उद्धाटन होते, तर कधी आम्ही केलेल्या कामाचं उद्धाटन ते करतात, असा टोलाही गृहमंत्र्यांनी लगावला

हॉर्स मौनटेड पोलीस युनिट नागपूरमध्ये सुरू करायच आहे, यासाठी मी प्रयत्न करत आहे. सेल्फ ब्लॅनसिंग स्कूटर, बॉडी वॉर्म कॅमेरा, ड्रोन हे आपल्याकडे आहेत. पण आणखी अद्यावत ड्रोन आणायचे आहे, असेही अनिल देशमुखांनी सांगितले.

मुंबईत 5 सायबर पोलीस स्टेशन सुरु करणार

सायबर क्राईम हा विषय महत्वाचा आहे. त्याच प्रमाण वाढत आहे. यामुळे गुन्हे वाढले यावर कस नियंत्रण आणायचं यासाठी सायबर क्राईमवर काम करायचं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत 5 सायबर पोलीस स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत. सायबर क्राईम वाढण्याच प्रमाण खूप मोठं आहे.

जगात 21 जानेवारीला सगळ्यात मोठा सायबर क्राईम घडला. डाटा सिक्युरिटी करणे आणि इतर सायबर गुन्ह्यावर नजर ठेवण्यासाठी सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट सुरू करणार आहे. प्रोजेक्ट 112 राबविला जाईल. त्या माध्यमातून घटनेच्या ठिकाणी पोलीस कमीत कमी वेळात कसे पोहचेल यावर काम होणार आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रोजेक्टसाठी 2000 पेक्षा जास्त टू व्हीलर लागणार असून ते आम्ही खरेदी करु, असेही अनिल देशमुखांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.