नागपूर गुन्हे शाखा पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करत 5 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केलं.
नागपूर : नागपुरात पुन्हा ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे (Nagpur Drugs Racket Busted). नागपूर गुन्हे शाखा पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करत 5 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केलं. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे (Nagpur Drugs Racket Busted).
नागपूर शहर ड्रग्ज तस्करीचा अड्डा बनत आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिकांना आता पडायला लागला आहे. कारण, गेल्या काही दिवसात ड्रग्ज तस्करीच्या होत असलेल्या कारवाया बघता नागपूर तस्करांच आवडत केंद्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की दोन व्यक्ती मुंबई वरुन एसटी बसने नागपुरात ड्रग्जची खेप घेऊन येत आहे.
त्या आधारावर पोलिसांनी व्हेरायटी चौकात सापळा रचला. नागपुरात एसटी बस पोहचताच आणखी एक जण त्यांच्या कडून ड्रग्ज घेण्यासाठी तिथे पोहचला. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ 56 ग्राम एमडी ड्रग्ज मिळून आलं. ज्याची आंतराष्ट्रीय बाजारात 5 लाखाच्यावर किंमत आहे. सोबतच त्यांच्या कडील इतर मुद्देमाल मिळून 6 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नागपुरात होत असलेल्या ड्रग्ज तस्करीच्या कारवाया बघता समाधान व्यक्त केलं जात असलं तरी या ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांचा बिमोड करण तेवढंच गरजेचं आहे.

