या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुणे : इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी इथं एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बावडा गावानजीक असणाऱ्या गणेशवाडीच्या शिवारातील पुलाखाली भीमा नदीच्या पात्रात 25 ते 30 वय असणाऱ्या युवकाची डेड बॉडी आढळून आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या केलेली असून शरीरापासून मुंडके, हात आणि गुडघ्यापासून पाय वेगळे केले आहेत. अशा परिस्थितीत ही बॉडी आढळून आल्याने इंदापूर तालुक्यात भीतीचं वातावरण आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे? आणि ऐवढ्या क्रुरतेने हत्या कोणी आणि का केली? याचा पोलीस शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांना युवकाचा मृतदेह दिसताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणात सध्या युवकाची ओळख पटवण्याचं काम सुरू असून स्थानिकांशी आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर क्रुरतेने संपूर्ण शरीराचे तुकडे केल्यामुळे ओळख पटवणं कठीण जात असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे पोलीस परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात काय धक्कादायक खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

